Category: हिन्दू सम्मेलन
written by Chandrakant Maniyar | March 6, 2026
विविध कार्यक्रमांची रेलचेल
मूल
मुल शहरातील शिवाजी वस्ती तर्फे विशाल हिंदू संमेलन शनिवार दिनांक 7 मार्च 2026 ला गुजरी चौकाच्या पटांगणात होणार आहे, सदर हिंदू संमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून आयोजकांनी जय्यत तयारी चालवली आहे, दुपारी 3 वाजता महिलांची कलशयात्रा व विविध वेशभूषेत यात्रेचे आयोजन केले आहे, सायंकाळी 4.30 वाजता गोमाता पूजन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे, सायंकाळी 5 वाजता संत व वक्ता उदबोधन राहणार आहे, या संमेलनात श्री मुरलीधर धाम, कार्तिकस्वामी हनुमान मंदिर चे परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज हे उपस्थित राहणार आहेत, सोबतच श्री कृष्णाजी ठाकरे प्रांत कार्यकारणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ यांचे उदबोधन लाभणार आहे, या नंतर महाआरती होईल व महाप्रसाद होणार आहे, परिसरातील सर्व बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज आयोजन समिती, शिवाजी महाराज वस्ती मुल यांनी केले आहे