मुल येथील नवभारत विद्यालय मध्ये शिक्षक पालक सभा संपन्न

मूल ( मेहुल मनियार )

नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,मूल येथे चालू शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळा-पालक यांच्यातील समन्वय साधण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
​सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे आदरणीय प्राचार्य सी जी बारसागडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, जेष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी, कु. उमक,  कु गोंगल , कु तलांडे, पालक प्रतिनिधी श्री. गणेश बाटवे, महिला पालक सौ.ललिता कवाडे उपस्थित होते.

  • ​   या सभेत चालू सत्रातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, त्यांची उपस्थिती आणि शिस्त यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

डिजिटल शिक्षण आणि सुविधा:

शाळेत उपलब्ध असलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि क्रीडा उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.
पालकांचा सहभाग: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पालकांनी घरी कसे लक्ष द्यावे आणि त्यांच्या कलागुणांना कशी चालना द्यावी, याबद्दल शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
​ अनेक पालकांनी शाळेच्या शिस्तीचे आणि उपक्रमांचे कौतुक केले, तसेच काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या.
​”विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया हा शाळा आणि पालक यांच्यातील मजबूत संवादामुळेच रचला जातो. पालकांनी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन शाळा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहील.”
नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सी जी बारसागडे  सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माथनकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विजय निखारे यांनी मानले. या सभेला शाळेतील शिक्षक वृंद विकास मोडक, भारत सलाम, राजू बोढे , शिक्षकेतर कर्मचारी राहुल नागापुरे, मनीषा मडावी, संगीता टांगले आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.