भारतीय जनता पक्ष महिला मोर्च्याच्या वतीने उप विभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन

मूल ( मेहुल मनियार )

      भारतीय जनता महिला मोर्च्याचे वतीने आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि आ.चित्रा ताई वाघ यांच्या मार्गदर्शन मध्ये मूल येथे झालेल्या प्रकरणातील आरोपी ना जलदगतीने शिक्षा व्हावी तसेच या प्रकरणात किंवा अशा प्रकारच्या प्रकरणातीला दोषींना कुठल्याही प्रकारे गय करू नये, तसेंच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना करावी. या मागणी च्या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी आमले साहेब यांना भाजप महिला मोर्च्याचे वतीने भेटून चर्चा केली आणि निवेदन देण्यात आले यावेळी  प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, शहर अध्यक्ष मनीषा गांडलेवार, प्रा. किरण कापगते  नगरसेविका प्राची आक्केवार, लीना बद्देलवार, वंदना वाळके,आशाताई गुप्ता आयशा शेख आदी उपस्थित होते.