बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले

मूल  ( प्रा .चंद्रकांत मनियार )

       पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल द्वारा शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच विशेष अतिथी म्हणून श्री धुडसे राउंड ऑफिसर मूल आणि प्रमुख अतिथी म्हणून बुराडे सर,  खोब्रागडे सर आणि शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार सर आणि विद्यार्थी प्रतिनिधी कुमार शक्य लाकडे विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी नाव्या पेंदोर हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या परिसरात विविध प्रकारची फळझाडे व शोभेची झाडे लावली. वृक्षांचे महत्त्व सांगताना शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही झाडांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात सुमारे ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या परिसराचे सौंदर्य वाढविण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी मान्यवारांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रभारी तोषी जयस्वाल यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शैक्षणिक प्रभारी दुर्गा कोटगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगान्याने झाली