Category: नगर परिषद निवडणूक 2025
written by Chandrakant Maniyar | December 5, 2025

मूल
मूल नगर परिषद ची सार्वत्रिक निवडणुक 2025 ची मतदान प्रक्रिया दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी एकुण 24 मतदान केंद्रांवर शांततेत व उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. निवडणुक प्रक्रीयेदरम्यान कोणतीही अनुचीत घटना घडली नाही व कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झालेली नाही.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व इलेक्ट्रानिक मतदान यंत्रे (EVMs) नियमानुसार स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून ती कायदेशीर प्रक्रीयेनुसार सीलबंद करण्यात आली आहे. मतदान यंत्रांच्या सुरक्षीततेसाठी त्रि-स्तरीय सुरक्षा प्रणालीचा अवलंब प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे.
याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात सर्व उमेदवार व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना बैठकीत बोलावले होते. सदर बैठकीत सर्व उपस्थीत उमेदवार व राजकीय पक्षाचे प्रतिनीधी यांना मतमोजणी, स्ट्राँगरुम सुरक्षा व्यवस्था, आदर्श आचारसंहिता याबाबत यथोचीत माहीती दिली. यामध्ये उच्च न्यायालय खंडपीठ, नागपुर यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी नियोजीत असलेली मतमोजणीची तारीख बदलण्यात आली असून मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार असल्याचे उपस्थीतांना कळविण्यात आले.
गोडाउनच्या साठवणूक व व्यवस्थापनाकरीता जबाबदार अधिकारी म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद मुल यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अभिरक्षागृहाच्या सुरक्षिततेसाठी Threelayer Security with inner cordon with reserve police या मानकाप्रमाने स्ट्राँगरुमच्या परीसरात 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.
पहील्या स्तरावर राज्यराखीव दलाची नियुक्ती करण्यात आली असून दुसऱ्या स्तरामध्ये पोलीस विभागातील पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. व तिसऱ्या स्तरामध्ये स्थानिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सदर परिसरात सर्व प्रकारचा अनाधिकृत प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला असून स्ट्राँगरुमचा संपुर्ण परिसर CCTV च्या निगराणीत आहे.
मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 पर्यंत उमेदवार/प्रतिनिधी यांना स्ट्राँगरुम परिसरातील CCTV फुटेज 24*7 पाहणेकरीता व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच CCTV तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
ही माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नगर परिषद मुल सार्वत्रिक निवडणुक 2025 यांनी प्रेस नोट द्वारे कळविली आहे.