बेलदार समाजाला भाजपा विसरले वाटते…स्व. कन्नमवार पुण्यतिथी च्या कार्यक्रमात समाज बंधू नी भावना व्यक्त केल्या

 

मुल :

       मूल शहरात बेलदार समाजाचे ४५७ घर आणि ३००० च्या वर मतदार असतांना होवु घातलेल्या मूल नगर परीषद निवडणुकीत भाजपाने बेलदार समाजाच्या कोणत्याही व्यक्ती ला उमेदवारी दिली नाही. विशेष बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने मात्र एक नव्हे तर तीन बेलदार समाज बांधवांना उमेदवारी देवुन समाजाचा सन्मान केला. या बाबीचा बेलदार समाजाने गांभीर्याने विचार केला पाहीजे. असे मत बेलदार समाजाचे जिल्हा संयोजक राजेंद्र कन्नमवार यांनी स्थानिक काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या कर्मवीर स्व.मा.सां.कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक काँग्रेस भवन येथे आज स्व. कर्मवीर कन्नमवार यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला.

      काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा स्थानिक काँग्रेस नेतृत्व संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात बोलतांना राजेंद्र कन्नमवार यांनी सांगितले की,अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतांना स्व. मा.सां.कन्नमवार यांनी वर्तमान पञ घरोघरी वाटप करून देशात उंची सर केली. त्यांनी केलेले कार्ये आणि निर्णायक भुमीका चंद्रपूर जिल्हावासीयांना अविस्मरणीय असुन त्यांनी बेलदार समाजाची राज्यात शान आणि बाण राखली आहे. त्यामूळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणे बेलदार समाजाचीच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक राजकारण्यांची जबाबदारीही असल्याचे सांगीतले.      यावेळी संतोषसिंह रावत यांनी कन्नमवारजींच्या कार्यावर प्रकाश टाकुन श्रध्दांजली अर्पण केली.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय चिंमड्यालवार, तालुकाध्यक्ष गुरुदास गुरनुले, शहराध्यक्ष सुनील शेरकी, बाजार समिती संचालक तथा बेलदार समाजाचे तालुका अध्यक्ष संदीप कारमवार, प्रशांत समर्थ, किशोर घडसे, जेष्ठ नेते बंडूभाऊ गुरनुले, विवेक मुत्यलवार, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, ऋतिक गोयल, भारती मेश्राम, बोरकर आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.