Category: महात्मा ज्योतिबा फुले जयंती
written by Chandrakant Maniyar | April 11, 2026
मूल ( मेहुल मनियार )
भारतीय जनता पक्ष मुल च्या वतीने मूल येथील महात्मा फुले चौकात आज दिनांक 11.04.2026 ला क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले, शहर अध्यक्ष प्रविण मोहूर्ले व महिला शहर अध्यक्ष श्रीमती मनीषा गाडलेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी चौकातील ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करन अभिवादन केले, या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते