Category: स्वर्गरथ
written by Chandrakant Maniyar | October 7, 2026
मुल ( मेहुल मनियार )
मुल नगरपरिषद मधील सद्यस्थितीत असलेले स्वर्गरथ (शव वाहिनी) वाहन जीर्ण झाल्यामुळे नवीन स्वर्गरथ खरेदी करण्याबाबत मागणी करणारे पत्र नगरसेवक श्री.राहुल प्रेमलवार यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
प्रेमलवार यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे की, एखाद्या कुटुंबातील व्यक्ती च्या मृत्यू नंतर अंतिम यात्रेत स्मशान भूमी पर्यंत शव वाहून घेण्यासाठी वापरण्यात येणारे स्वर्गरथ वाहन जीर्ण झाल्यामुळे वारंवार त्याची दुरुस्ती केली जात आहे.
एखाद्या कुटुंबाच्या दुःखद प्रसंगी स्वर्गरथ वाहन अचानक बंद पडल्यास त्या कुटुंबांना मानसिक त्रास होऊ शकतो. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाला वेळेत आणि सन्मानपूर्वक सेवा मिळणे, आवश्यक असल्याने या मागणीचा विचार करून मुल नगरपरिषदेने आवश्यक निधी उपलब्ध करून सुसज्ज असे स्वर्गरथ वाहन खरेदी करावे, अशी मागणी राहुल प्रेमलवार यांनी केलेली आहे .या मागणी पत्राची प्रत नगराध्यक्ष यांना सुद्धा दिलेली आहे.