मूल तालुका काॅंग्रेस कमेटी तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

मूल  ( मेहुल मनियार )

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार‚ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मूल तालुका काग्रेस कमेटी च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटनीस श्री संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात मुल शहरातील विविध विहारांना भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. एकताताई समर्थ‚ उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार, सभापती प्रशांत भाऊ समर्थ,तालुका काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष गुरुभाऊ गुरुनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी‚ तालुका महिला अध्यक्ष रूपाली संतोषवार‚ महिला शहर अध्यक्ष तथा सभापती नलिनीताई आडपवार‚ खरेदी विक्री सोसायटी चे अध्यक्ष घनश्यामजी येनूरकर, राजू पाटील मारकवार, शहर युवक अध्यक्ष मिथून पटवा‚सभापती विलास कागदेलवार, सभापती लिनाताई फुलझेले‚ उपसभापती समिक्षा कडस्कर ‚ नगर सेवक नितीन गद्देवार , अतुल गोवर्धन ,विवेक मुत्त्यालवार, अशोक येरमे, ऋतिक गोयल, तुकाराम गुरुनुले, गुलाब पठाण, सुशीला खोब्रागडे , कु.काजल धारणे, उज्वला कामडे , सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड खोब्रागडे, सुरेश फुलझले, कृषि उत्पन्न बा. स. संचालक सौ. चंदाताई कामडी, संदीप  कारमवार, गुरुदास चौधरी, भास्कर खोब्रागडे, सलीम कुरेशी, गणेश मेश्राम, अभि भीमनवार, कृष्णा बोरेवार, शामला बेलसरे, मैथिली हेडाऊ, समता बंसोड, भूमिका मडावी, रागिणी कोपुलवार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला काॅंग्रेस कार्यकर्त्यासह मुल शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते*.