कर्मवीर महाविद्यालयात ‘नशा मुक्त युवा भारत’ प्रतिज्ञा अभियान

मूल  ( मेहुल मनियार )

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे “नशा मुक्त युवा भारत – विकसित भारत २०४७” या ऑनलाईन प्रतिज्ञा अभियानाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

       या उपक्रमात एकूण २७० जणांनी MY Bharat पोर्टलवर नोंदणी करून व्यसनमुक्तीची ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण उपरे व डॉ. केवल कऱ्हाडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.