समन्वय ठेऊन निवडणुकीचा प्रचार केला पाहिजे…आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले

कॉंग्रेस पक्षाचा वचननामा प्रकाशित

मूल :

     मूल नगर परिषद ची निवडणूक 2 डिसेंबर ला होऊ घातली आहे. या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा तर्फे वचन नामा प्रकाशित करण्यात आला. माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या मुख्य उपस्थिती मध्ये झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस चे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले की, आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची आवश्यकता आहे. धमक्या देवून, मत चोरून आणि पैशाचे पॉकेट वाटुन लोकशाही टिकत नाही. त्यामुळे कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम आणि समन्वय ठेवुन प्रचार करावा. असे मत माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.


स्थानिक रामलीला भवन समोर पार पडलेल्या विरोधकांच्या सभेत झालेले भाषण म्हणजे पराभवाच्या भितीपोटी पदाचा दुरुपयोग असुन त्यावर आपण लवकरच उत्तर देवु. असे सुद्धा त्यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी कॉंग्रेसपक्षात एकतेचा विचार रुजला असुन पक्षाचे सर्व कार्यकर्ते नाराज न होता एकदिलाने एकता समर्थ यांच्या विजयासाठी परिश्रम घेत असल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी पक्षाच्या नगर अध्यक्ष एकता समर्थ यांचेसह सर्व उमेदवारांनी आपला परिचय करून दिला. शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी संचालन आणि तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले यांनी आभार मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ, राजेंद्र कन्नमवार, घनश्याम येनुरकर, प्रा. किसन वासाडे, रुपाली संतोषवार, बाबा अजीम. संदीप कारमवार, किशोर घडसे, पवन नीलमवार आदी उपस्थित होते.