मूल मध्ये ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान “भाऊंचा गरबा महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन

अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची विशेष उपस्थिती

गरबा स्पर्धांमध्ये लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

मूल  ( मेहुल मनियार )

नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर घालण्यासाठी मूल येथे स्व.चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समितीच्या वतीने ‘भाऊंचा गरबा महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, मूल येथे हा महोत्सव रंगणार असून विविध गरबा स्पर्धा व आकर्षक बक्षिसे हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
या महोत्सवात मूल शहर व तालुक्यासह परिसरातील गरबाप्रेमींनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिला, युवक-युवती आणि नागरिकांना एकत्र आणून सांस्कृतिक परंपरेचे जतन करणे, तसेच गरब्याच्या माध्यमातून कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
दिनांक 19 ऑक्टोबर ला होणाऱ्या खुल्या गटातील गरबा स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये
महोत्सवातील खुल्या गटातील गरबा स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २ हजार रुपये ठेवण्यात आले असून, प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये नगर परिषद मुल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे आणि तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये माजी भाजपा मुल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
मूल तालुका व मुल शहर गटासाठी स्वतंत्र स्पर्धा
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मूल तालुका व शहर गटातील गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १ हजार रुपये असून, प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये सोनिया गुरनुले, द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये मोतीलाल टहलियानी आणि तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये संजय चिंतावार यांच्याकडून ठेवण्यात आले आहे.

सोलो व कपल गरबा स्पर्धाही रंगणार

महोत्सवात वैयक्तिक आणि जोडीने गरबा सादर करणाऱ्या स्पर्धकांसाठीही स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सोलो गरबा स्पर्धा होणार असून, प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये आणि तृतीय २ हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते संदीप आगडे यांच्याकडून ठेवण्यात आले आहेत .
मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी कपल गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये भाजपा ओबीसी मोर्चा मुल शहराध्यक्ष युवराज चावरे सर यांच्या कडून बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची विशेष उपस्थिती

या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची उपस्थिती. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता त्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभण्याची अपेक्षा आहे.

रील्स स्पर्धेतही बक्षिसांची लयलूट

गरब्याच्या उत्साहाला आधुनिक डिजिटल माध्यमांची जोड देत रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये आणि तृतीय ३ हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ झरकर यांच्याकडून ठेवण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या युवक-युवतींनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.

दररोज आकर्षक भेटवस्तूंची संधी

महोत्सवादरम्यान दररोज भाग्यवान विजेत्यासाठी चंद्रपूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या महामंत्री शिवानी आगडे यांच्याकडून 1500 रुपये व सामाजिक कार्यकर्ते सुधीर भोयर यांच्या कडून सन्मानचिन्ह तसेच १० भाग्यवान सहभागींसाठी आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी दररोज विजेत्या स्पर्धकाला सुरज मांदाडे यांच्याकडून 500 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. नियमित गरबा कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
गरबा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आयोजक स्व. चांगुनाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मुल चे नंदकिशोर रणदिवे,सुधीर भोयर, प्रशांत बोबाटे, युवराज चावरे,सुरज मांदाडे,शिवानी आगडे,सोनिया गुरनुले,विद्या बोबाटे,प्रा.अर्चना चावरे,मनीषा भोयर,कार्तिकी भोयर, जान्हवी रणदिवे, दिक्षा रणदिवे, भावना चौखुंडे, प्रितीश संगेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे मूल शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक वाढणार असून, पारंपरिक गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना आनंदाचा अनुभव घेता येणार आहे.