Category: आरोग्य शिबीर
written by Chandrakant Maniyar | August 2, 2026

मूल ( मेहुल मनियार )
पूज्य सिंधी पंचायत, मूल आणि आरोग्यधाम हेल्थकेअर सोसायटी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 304 व्या मोफत आयुर्वेदिक रोगनिदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मूल येथील श्री झूलेलाल मंदिर, मध्ये आयोजित या शिबिरात एकूण १५१ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘घराघरात आयुर्वेद’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जीकुमार आरोग्यधामचे संचालक डॉ. जी. कुमार ममतानी आणि डॉ. अंजू ममतानी यांनी विविध आजारांवर सखोल मार्गदर्शन केले. संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, सांधेदुखी, कंबरदुखी, थायरॉईड, दमा, पांढरे डाग, स्त्रीरोग तसेच इतर अनेक दीर्घकालीन आजारांवर आयुर्वेदिक उपचारपद्धतीचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न. प. चे उपाध्यक्ष राकेश रत्नावार होते, तर नगरसेवक विवेक मुत्तेलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. जी. कुमार ममतानी आणि डॉ. अंजू ममतानी यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. डॉ. ममतांनी यांचे हे 304 वे निशुल्क रोग निदान शिबिर आहे.. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे.
शिबिराचे आयोजन पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष अमर आयलानी, उपाध्यक्ष विजय केशवानी, सचिव विजय अडवाणी आणि कोषाध्यक्ष प्रकाश उधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणकानी, संजू गुलानी, आशिष उधवाणी, गुलशन टहलियानी, रामू मायदासानी तसेच सिंधी समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव यांनी परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक मोतीलाल टहलियानी यांनी केले, तर उपस्थिता चे आभार संजय गुलानी यांनी मानले.