लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

मूल ( मेहुल मनियार )

   शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून या महान विभूतींना आदरांजली वाहिली.

      यावेळी वक्त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रप्रेम, शिक्षणाविषयीचे विचार तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन जोपासावा, असे आवाहन करण्यात आले.

      या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.