Category: महात्मा गांधी जयंती
written by Chandrakant Maniyar | October 2, 2026

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
मूल येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल, येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार आणि शैक्षणिक प्रभारी कु दुर्गा कोटगले मंचावर उपस्थित होते आणि शाळेचे प्राचार्य विनोद सर यांनी विद्यार्थांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि अन्य मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या महान नेत्यांच्या जीवनकार्याचे स्मरण केले.
महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि शांततेचे विचार तसेच लालबहादूर शास्त्रीजींची साधी राहणी, उच्च विचारसरणी, प्रामाणिकपणा आणि देशसेवेची भावना विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. “जय जवान, जय किसान” या घोषणेच्या माध्यमातून जवान आणि शेतकरी यांचे देशाच्या विकासातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देशभक्ती, स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली आणि महापुरुषांच्या आदर्शांचे पालन करण्याची प्रेरणा मिळाली. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुहीना सय्यद हिने केले आणि आभार प्रदर्शन प्रणोती पुण्यपरेड्डीवार हिने केले.