नगराध्यक्ष पदासाठी चुरस: मूलमध्ये मतदानाला संथ गती

मूल

मुल नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी आज सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र सध्या मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. दुपारी ११.३० वाजेपर्यंत केवळ १८.१६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रा. डॉ. सौ. किरण किशोर कापगते आणि काँग्रेसकडून सौ. एकता प्रशांत समर्थ रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

सकाळपासूनच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मतदान केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांची उपस्थिती, मतदारांना मतदानासाठी आवाहन आणि नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे वातावरण उत्साही झाले आहे. उमेदवारांनीही, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून अंतिम टप्प्यातील मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानुसार आता मत मोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना तोपर्यंत निकालाची वाट पहावी लागणार आहे.