कृषि महाविद्यालय, मूल येथे वैद्यकीय आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रेबीज प्रतिबंधक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
Category: आरोग्य शिबीर

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
कृषि महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वैद्यकीय आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व रेबीज प्रतिबंधक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथील डॉ. विस्मय देवतळे (वैद्यकीय अधिकारी) आणि श्रीमती अश्विनी अशोक येम्बरवार (सिकलसेल प्रयोगशाळा प्रमुख) उपस्थित होते. तसेच, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील रक्तसंकलन पथक उपस्थित होते. या पथकामध्ये डॉ. प्रणल रामटेके (रक्त संक्रमण अधिकारी), श्रीमती योगिता माळी (समाजसेवा अधीक्षक), श्री. उज्वल जावंजाळ (अधीपरिचारक), श्रीमती रूपाली येनूरकर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्रीमती तानिका आंबटकर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), श्री. विजय कोटावार (कक्षसेवक) आणि श्री. रुपेश घुमे (वाहनचालक) यांचा समावेश होता.
