विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील विद्यार्थिनी कु.नंदिनी देऊलवार चे एन.एम.एम.एस. परीक्षेत सुयश

NT-C प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम

मूल  ( मेहुल मनियार )

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .यामध्ये मूल तालुक्यातील विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील विद्यार्थिनी कु.नंदिनी शंकर देउलवार हिने घवघवीत यश संपादन केले.नंदिनीने चंद्रपूर जिल्ह्यातून जनरल प्रवर्गातून पाचवे मेरिट स्थान पटकाविले असून NT-C प्रवर्गातून ती जिल्ह्यातून पहिली आली आहे. नंदिनी ही मूळची जुनासुर्ला येथील असून तिने इयत्ता आठवीमध्ये असताना ही परीक्षा दिली होती.एकूण 180 गुणापैकी तिने 124 गुण मिळवून गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले.या यशामुळे तिला आता इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत पुढील 4 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.ग्रामिण भागात राहून व जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.नंदिनीच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक के.सी. कामडी, शाळेचे शिक्षक वृद व कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती यांनी तिचे व तिच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षक नागेश संदमेनवार यांचे विशेष अभिनंदन केले आहे .