राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकर १७ मार्चला चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

मूल ( मेहुल मनियार )

      राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष ऍड वसंत मनकर याच्या विदर्भ दौऱ्याला 13मार्च पासून सुरवात झालेली आहे. दौऱ्याचा शेवटचा टप्यात चंद्रपूर येथे येणार असून शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्याच्या अडचणी समजून घेणार आहेत.
१७ मार्चच्या चंद्रपूर भेटीच्या वेळेस चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीसाठी जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सचिव आंबीद अली, आणि सर्व फ्रंटलंचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी १७ तारखेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केले आहे.