एकतेच्या ताकदीवर प्रभाग 3 मध्ये नितीन-शालूताई ची भरारी, विरोधकांची धडधड वाढली!

मूल

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेसचे उमेदवार मिथुन (नितीन) गद्देवार आणि शालुताई शेरकी यांनी संपूर्ण प्रचार आपल्या बाजूने वळवला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दोघेही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले मनमिळाऊ उमेदवार असल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. एकता प्रशांत समर्थ या निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्याही प्रचाराला चांगले वातावरण मिळत आहे. त्यामुळे प्रभाग ३ मधील उमेदवारांना याचा निश्चितच फायदा होईल, अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे.

विरोधकांचे जातीगत समीकरणांचे राजकारण भेदत ही जोडी येत्या ३ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी विजयी होऊन नगरसेवक म्हणून पुढे येईल, अशी जोरदार चर्चा सध्या प्रभागात ऐकू येत आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसची ‘स्त्रीशक्ती’ विरोधकांना निश्चित पराभूत करेल, असा विश्वासही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.