मालधक्का हटाव संघर्ष समितीच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मुल येथे नागरी सत्कार रविवारी

मूल ( मेहुल मनियार )

      मूल शहरात प्रस्तावित मालधक्का रद्द करून शहराला संभाव्य प्रदूषणाच्या धोक्यापासून वाचविल्याबद्दल माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ३१ मे ला मूल येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

       मालधक्का विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातील सर्वपक्षीय राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आले असून, या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

       मूल शहरात प्रस्तावित मालधक्का उभारणीमुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मालधक्का रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करत भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.

      शिक्षण प्रसारक मंडळ, मूलचे अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या कार्यक्रम प्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून मूल नगरपालिकेच्या अध्यक्षा सौं.एकता ताई समर्थ, उपाध्यक्ष राकेश रत्नावार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जीवन कोंतमवार यांनी केले आहे.