डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मूल येथे भाजपा कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न

मूल ( मेहुल मनियार )

भारतीय जनता पार्टी, मूल शहरच्या वतीने भारताच्या एकात्मतेचे प्रणेते, महान राष्ट्रवादी विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यकर्ता संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमात डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रभक्ती, अखंड भारताच्या संकल्पनेवरील त्यांचे योगदान आणि जनसंघाच्या स्थापनेपासून राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, बल्लारपूर विधानसभा संघटन प्रभारी राम लखिया, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, तसेच प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा उपाध्यक्ष साकेत भानारकर उपस्थित होते. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तनय देशकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करत संघटन बळकटीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन पक्षाचे विचार व केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रासाठीचे बलिदान, “एक देश, एक विधान, एक निशाण” या विचाराची प्रेरणा आणि भारतीय जनता पार्टीच्या वैचारिक पायाभरणीत त्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी भाजपा मूल शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.