Category: वाढदिवस
written by Chandrakant Maniyar | July 30, 2026
नगरसेविका सौ. अश्विनीताई रुपेश निकोडे यांच्याकडून नागरिकांना बसण्याच्या बाकांची भेट
मूल
मूल शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये आमदार तथा माजी मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. अश्विनीताई रुपेश निकोडे यांनी नागरिकांसाठी बसण्याच्या 20 बाकांची (बेंचेस) भेट दिली.
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरामदायी बसण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सौ. अश्विनीताई रुपेश निकोडे यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमाबद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सौ. अश्विनीताई रुपेश निकोडे यांचे आभार मानले तसेच आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.