प्रभात 5: कट-कारस्थानं संपली, जनतेचा निर्णय ठाम!ऋतिक गोयल यांचा विजय निश्चित!

मूल

नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसकडून उमेदवार करण्यात आलेले रितिक दिनेश गोयल हे या निवडणुकीतील सर्वात तरुण, शिक्षित आणि सेवाभावी उमेदवार म्हणून जनतेच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने आणि सेवाभावी दृष्टिकोनातून रितिक गोयल यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे पहिले पाऊल टाकले असून, अल्पावधीतच त्यांनी नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासूनच प्रभाग ५ मध्ये रितिक गोयल विजयाचे प्रबळ दावेदार ठरणार, असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज होता. आज तोच अंदाज सत्यात उतरत असल्याचे चित्र जनतेच्या वाढत्या पाठिंब्यातून स्पष्ट होत आहे.

या संपूर्ण प्रचारकाळात रितिक गोयल यांना काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ तसेच त्यांचे पती प्रशांत समर्थ यांचे भक्कम मार्गदर्शन आणि सक्रिय पाठबळ लाभले. प्रशांत समर्थ यांची सेवाभावी वृत्ती, एकता समर्थ यांचे नेतृत्वगुण आणि रितिक गोयल यांचा जनतेशी असलेला जिव्हाळा,या तिन्ही घटकांच्या संगमातून प्रभाग ५ मध्ये काँग्रेससाठी ‘अटूट विश्वासाचे वातावरण’ तयार झाले आहे.

दरम्यान, विरोधकांकडून भावनिक मुद्दे, जातीय राजकारण आणि उंच-नीचतेचे आरोप लावण्याचे प्रयत्न जोरात झाले. मात्र, जनतेने हे सर्व डावपेच ठामपणे नाकारले असून विकास, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ प्रतिमेलाच पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, रितिक गोयल हे प्रभाग ५ मधून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची दाट शक्यता असून, मूल नगरपरिषदेतील सर्वात युवा नगरसेवक’ म्हणून त्यांची ओळख निर्माण होणार आहे. याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी एकता समर्थ यांनाही याच प्रभागातून मोठी आघाडी मिळण्याचा स्पष्ट अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकंदर पाहता, प्रभाग ५ मध्ये काँग्रेसचा विजयाचा ध्वज फडकण्याची जोरदार शक्यता असून, मूल शहराच्या राजकारणात हा निकाल महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार, असे चित्र निर्माण झाले आहे.