प्रशांत समर्थ म्हणजे सेवा,सौ. एकता समर्थ म्हणजे सक्षम नेतृत्व!

मूल

नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सौ. एकता प्रशांत समर्थ या केवळ एक उमेदवार नसून, त्या एका मूल्यनिष्ठ कुटुंबाच्या प्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठीशी उभा असलेला आधार म्हणजे त्यांचे पती प्रशांत समर्थ:एक साधा, सामान्य कुटुंबातून पुढे आलेला, पण असामान्य कार्य करणारा समाजसेवक.

प्रशांत समर्थ यांनी कोणत्याही राजकीय वारशाचा आधार न घेता, केवळ स्वतःच्या कष्टावर, प्रामाणिकपणावर आणि लोकांच्या सेवेतून शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २४ तास जनतेसाठी झटणारा हा व्यक्तिमत्त्वाचा प्रवास समाजकारणातून राजकारणापर्यंत पोहोचला असून, प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपली छाप उमटवली आहे.

मूल शहरात असा समाजसेवक सापडणे दुर्मीळ आहे, जो दिवस-रात्र लोकांसाठी झटतो, कोणताही स्वार्थ न ठेवता काम करतो आणि प्रत्येक गरजूच्या अडचणीत धावून जातो. शहरातील लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात प्रशांत समर्थ यांच्याविषयी आपुलकी, आदर आणि विश्वास आहे.

या प्रवासात सौ. एकता समर्थ यांनीही आपल्या पतीच्या प्रत्येक निर्णयाला खंबीर साथ दिली आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक सामाजिक व राजकीय लढाईत सहभागी राहिल्या. म्हणूनच आज ही जोडी केवळ पती-पत्नी म्हणून नाही, तर सेवाभावाची एक मजबूत टीम म्हणून जनतेच्या नजरेत आहे.आज मूल शहरात सर्वसामान्यांमध्ये एकच चर्चा आहे,“प्रशांत समर्थ यांनी आतापर्यंत शहरासाठी खूप दिले आहे, आता शहराने त्यांना देण्याची वेळ आली आहे!”

राजकीय जाणकारांचेही मत आहे की, समाजकारणाला जीवन मानणारा हा माणूस पुढील काळात मोठ्या उंचीवर पोहोचेल. त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती म्हणजे जनतेचा अपार विश्वास आणि प्रेम.

सौ. एकता समर्थ आणि प्रशांत समर्थ यांची ही जोडी मूल शहरासाठी काहीतरी भव्य, काहीतरी ऐतिहासिक घडवेल, असा ठाम विश्वास आज सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.