Category: शेतकरी समस्या
written by Chandrakant Maniyar | October 25, 2026

मुल (मेहुल मनियार )
खेत बचाओ मोहीम अंतर्गत “रब्बी हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण” दिनांक 22/10/2026 ला ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, भवराळा येथे आयोजित करण्यात आला. मा. श्री. अरुण कुसळकर साहेब प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर यांनी रब्बी हंगाम नियोजनातील कोणकोणते पीक घ्यावे त्यांची कार्यपद्धती कशी राहील याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी मुल येथील श्री. सुनील कारडवार यांनी कृषी विभागातील विविध योजना, महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या अनुदान व PMFME योजना व रबी हंगामातील येणाऱ्या सबसिडीवरील बियाणे बद्दल माहिती दिली. डॉ. प्रवीण देशपांडे शास्त्रज्ञ kvk सिंदेवाही यांनी रवी हंगामातील पिकांवर येणाऱ्या कीड व रोगाबद्दल माहिती दिली. श्री. वामन बोरकुटे, मास्टर ट्रेनर सेंद्रिय शेती यांनी सेंद्रिय शेतीवर आधारित निविष्ठा तयार करणे व त्या कशा वापरायच्या याबद्दल सविस्तर माहिती दिली. श्री. आनंदरावजी शेंडे प्रगतिशील शेतकरी भवराळा यांनी प्रगतीतील शेतकरी कसे बनता येईल याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. उप कृषी अधिकारी कु. शिल्पा मंत्रीवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर तसेच पाणी फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या योजना बद्दल माहिती दिली. कु. लता सावसाकडे सहाय्यक कृषी अधिकारी भवराळा व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात धान पिकावरील कीड रोग, कृषी विभागाच्या योजना, सेंद्रिय शेती, pmfme योजना , FF S खत बुकिंग अँप,रब्बी हंगामातील पूर्वनियोजन, कमी कालावधीचे व कमी पाण्याचे पीक लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. जितू झोडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले व तसेच आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.