साठवलेल्या धान्यावरील कीड व त्यावरील नियंत्रणावर इंदाला गावात विद्यार्थ्यांनी केली जनजागृती 

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यातील इंडाळा येथे 18 जून 2026 रोजी साठवलेल्या धान्यावरील कीड व त्यावरील नियंत्रणावर माहिती देण्याच्या दृष्टीने जनजागृतीच्या कार्यक्रमा चे आयोजन केले होते.
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १)तांदूळ मावा (rice weevil)२) लहान धान्य भुंगा lesser grain moth)
३) खापरा भुंगा khapra bettle ४) तांदूळ पतंग (rice moth ) या किडीचे पिकावर नुकसान व त्यावरील नियंत्रण उपाय यावर माहिती दिली
गावातील लोकांनी उस्फूर्तपणे सर्व माहिती जाणून घेतली .

कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेने हा प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी. गजभिये, कृषी संशोधन केंद्र, सोनापूर येथिल वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जी.बी गणवीर आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे व विषयतज्ञ डॉ. भूषण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .
सदर उपक्रम कृषी महाविद्यालय मुल चे कृषी दूत स्वयम जथाडे, चेतन कापगते, रोहित राऊत यांनी राबविला.