भाजपा महिला आघाडी मूल तर्फे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन

मूल  ( मेहुल मनियार )

       रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, मूल शहराच्या वतीने उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलीस स्टेशन मूल येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस अधिकारी व महिला आघाडीच्या सदस्यांनी यावेळी आपुलकीच्या वातावरणात हा सण साजरा केला.
“समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,” अशी भावना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा महिला आघाडी, मूल शहराच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम प्रमुख सौ.प्रा. किरण कापगते,महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती मनिषा गान्डलेवार,माजी नगराध्यक्ष सौ.उषा शेंडे, नगरसेविका सौ.प्राची आक्केवार ,कु. रीना मसराम ,लीना बद्देलवार, गीता आंबदुर्तीवर, कुमुदिनी भोयर,कल्पना मेश्राम, आयेशा शेख,कविता चन्नावर ,शारदा नन्नावरे, विजया महावद्दीवार,अनिता डुमेवार, सुनीता कुतरमारे,ज्योती गुरनुले,फुला वालकोंडे, सुलभा कुलसंगे, मनिषा राखडे, वैष्णवी कोलप्याकवार सह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.