संतोष सिंह रावत यांच्याकडे गोंदिया जिल्हा प्रभारी व विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी

मूल : (मेहुल मनियार)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा प्रभारी आणि विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मूल तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
एखाद्या नेत्याची खरी ओळख त्याला मिळालेल्या पदावरून नाही, तर त्यांने उभ्या केलेल्या कार्यकर्त्याच्या फळीवरून आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासावरून ठरते. असेच नेतृत्व रावत यांनी मूल तालुक्यात घडवले आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्या सूचनेवरून आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाने नुकतीच ही घोषणा केली. पक्ष संचटना बळकट करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संतोषसिंह रावत हे मूल तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावान नेते असून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी निस्वार्थपणे काम केले आहे. कार्यकर्त्याशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि जनसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळेच त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
या नियुक्तीनंतर संतोषसिंह रावत यांनी आपली भावना व्यक्त केली व सांगितले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखबला आहे, तो मी पूर्ण ताकदीने पेलणार आहे. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयन करणार आहे. मूल तालुक्यातील कार्यकर्ते आणि जनतेच्या समस्या वरिष्ठांपर्यत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.”
या नियुक्तीमुळे मूल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदांचे वातावरण आहे. कार्यकर्त्यानी आतिषबाजी करत गुलाल उधळून आनंदोत्सब साजरा केला. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी रावत यांचे अभिनंदन केले असून, यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.