चंद्रपुर जिल्हात Smart Pharmacist Course 2.0 यशस्वीरित्या संपन्न
Category: स्मार्ट फार्माशिस्ट कोर्स

मूल ( मेहुल मनियार )
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी, *AIOCD व MSCDA अध्यक्ष सन्माननीय श्री. जगन्नाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली MSCDA चे उपाध्यक्ष मान. मुकुंदभाऊ दुबे, MSPC अध्यक्ष अतुलजी अहिरे,MSPC उपाध्यक्ष धनंजय भाऊ जोशी, MSPC सदस्य गणेशजी बंगळे,
यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल, मुंबई व चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (CDCDA) यांच्या संयुक्त विद्यमाने मूल येथील हेडगेवार सभागृहामध्ये Smart Pharmacist Course 2.0+ हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मूल, सिंदेवाही व सावली तालुक्यातील एकूण 80 फार्मासिस्ट बंधु व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
