विद्यार्थ्यांना आता निकाल लागल्या पासून 30 दिवसात मिळणार मूळ गुणपत्रिका

मूल ( मेहुल मनियार )

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याना आता निकाल लागल्या पासून 30 दिवसात मूळ गुणपत्रिका मिळणार आहे.
23 मार्च 2026 रोजी झालेल्या अधिसभेमध्ये डॉ. शीला नरवाडे (सूर्यतळे) यांनी विद्यार्थ्यानी मूळ गुणपत्रिका निकाल लागल्यापासून 5 दिवसात वितरित करण्यात याव्यात असा प्रस्ताव मांडला.
सहसंचालक, नागपूर यांच्या दि. 17 फेब्रु. 2026 च्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृतीकरीता अर्ज सादर करताना सोबत मूळ गुणपत्रिका जोडाव्या लागतील, अन्यथा अर्ज बाद होईल आणि याकरीता ज्या महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते महाविद्यालय जवाबदार राहील. डॉ शीला नरवाडे (सूर्यतळे) यांनी प्रस्तावामागील उद्देश स्पष्ट करताना संगितले की, गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत उच्च शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थ्या हे मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत. अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाकडून शिक्षणा करिता मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर अवलंबून आहेत. त्या मुळे मूळ गुणपत्रिके अभावी शिष्यवृत्तीचा अर्ज नामंजूर झाला तर हे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून दुरावू शकतात.
यावर मा. कुलगुरू यांनी संचालक, परीक्षा मंडळ यांच्याशी चर्चा करून आश्वासीत केले की, मूळ गुणपत्रिका 30 दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मा. सहसंचालक यांना शिष्यवृतिकरीता अर्ज ऑनलाइन गुणपत्रिका सह स्वीकारण्या करीता पत्रव्यवहार करण्यात येईल.