उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचा मूल तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार

केंद्र सरकारच्या अति उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार
मूल  ( मेहुल मनियार )

      मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित शशिकांत आमले यांना केंद्र सरकारच्या अति उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या अभिनंदनिय कार्याबद्दल मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांनी गेल्या 25 वर्षांपासून पोलीस दलात सेवा बजावली आहे. गडचिरोली, नाशिक, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
मागील वर्षी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात नियुक्ती झाली असून सध्या ते मूल येथे उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत त्यांना यंदाचे केंद्र सरकारचे अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन मूल तालुका पत्रकार संघाने त्यांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे, उपाध्यक्ष गुरु गुरनुले, सचिव भोजराज गोवर्धन, सहसचिव रमेश माहुरपवार, कोषाध्यक्ष प्रा. चंद्रकांत मणियार, जेष्ठ पत्रकार राजू गेडाम, विनायक रिकलवार, दीपक देशपांडे, युवराज चावरे, अशोक येरमे, उपस्थित होते.
नागरिकांची सुरक्षितता आणि जनहितासाठी सदैव तत्पर राहू, असे सत्यजित आमले यांनी यावेळी सांगितले.