भाजप महिला मोर्चा मुल तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचा सत्कार

मुल  ( मेहुल मनियार )

       मुल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सत्यजित आमले यांना पोलीस विभागातील उल्लेखनीय व अतिविशिष्ट कामगिरीबद्दल विशेष पदकाने गौरविण्यात आले. नुकतेच चंद्रपूर येथे आयोजित पोलीस विभागाच्या समारंभात पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या हस्ते त्यांना हे विशेष पदक प्रदान करण्यात आले.
श्री. सत्यजित आमले हे अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित आहेत. पोलीस विभागात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, मुल शहर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. सत्यजित आमले यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यामुळे पोलीस विभागाची विश्वासार्हता अधिक दृढ होत असून, अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान हा समाजासाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या सत्कार प्रसंगी महिला मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या वंदना आगरकाटे, जिल्हा कार्यक्रम प्रमुख प्रा. डॉ. सौ. किरण कापगते, शहर अध्यक्षा श्रीमती मनीषा गांडलेवार, नगरसेविका अश्विनी निकोडे, महासचिव लीना बदेलवार, आशा गुप्ता, आयेशा शेख, संगीता वाळके, कुत्तरमारे ताई, अनिता दुमेवार तसेच महिला मोर्चाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला मोर्चाच्या वतीने श्री. सत्यजित आमले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.