Category: ग्राम जयंती महोत्सव
written by Chandrakant Maniyar | May 5, 2026

मूल ( मेहुल मनियार )
अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ तालुका मुल आणि श्री गुरुदेव बचत गट मुलच्या संयुक्त विद्यमाने वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११७ वी जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रातःकाळी सामुदायिक ध्यानाच्या वेळी ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर यांनी ग्रामगीता अध्याय वाचन तर उमेश उरकुडे यांनी चिंतन प्रस्तुत केले.या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आर्त संदेशानुसार सकाळी मुल मधील मुख्य मार्गाने रामधुन आणि भजन दिंडी काढण्यात आली यात श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा, सिंतळा,गडीसुर्ला,पेंढरी कोकेवाडा ,चुरुळ तुकुम,उश्राळा चेक, येरगाव,पिपरी दिक्षित,मुल, चिमढा,टेकाडी , खेडी ,मरेगाव आदी सह १० भजन मंडळांनी सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विहीरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भजन दिंडी कार्यक्रम स्थळी पोहचल्यावर रामधुनविषयी रमेश बोरुले यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर ग्रामगीताचार्य अशोकराव कोसरे, डॉ.मादेशवार, प्रमोदभाऊ वडगावकर आणि संच , श्री गजाननराव वडगावकर गुरुदेव सेवा मंडळ शाखा तिर्थरुपनगर चंद्रपूर यांनी ग्रामजयंती विशेष अभंगवाणी कार्यक्रमात सुमधुर आवाजात अभंग सादरीकरण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.ग्रामजयंती महोत्सव निमित्ताने वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने श्री गुरुदेव कार्यकर्ता, प्रचारक चिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा मालार्पण,अधिष्ठान पुजन आणि “गुरुदेव हमारा प्यारा, है जीवनका उजियारा” या संकल्पगीताने मेळाव्याची सुरुवात झाली.
उद्घाटन नगराध्यक्षा एकता समर्थ यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव गमे माजी सर्वाधिकारी तथा अन्नदान विभाग प्रमुख गुरुकुंज आश्रम , विशेष अतिथी म्हणून संतोषसिंह रावत माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, प्रमुख पाहुणे जिल्हा सेवाधिकारी अँड दत्ताभाऊ हजारे, नगरपरिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी नगराध्यक्षा रत्नमालाताई भोयर, प्रचारक मदनराव ठेंगणे, जिल्हा प्रचारप्रमुख सुरेश चौधरी, सरचिटणीस दादाजी नंदनवार, डॉ.सविता सादमवार, उमाजी मंडलवार, मेघश्याम ताजने यांच्या सह नवनिर्वाचित नगरसेवक विवेक मुत्यलवार, अतुल गोवर्धन, अशोक येरमे ,समिक्षा कळसकर, ज्योती चटारे,लिना फुलझेले, काजल धारणे, नलिनी आडेपवार आदींची उपस्थिती होती.सलोनी आणि सुहाना यांनी स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.याप्रसंगी ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले लिखित “ऋणानुबंध नात्यांचे” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येऊन उपस्थित मान्यवर आणि नगरसेवक यांचा ग्रामगीता,शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अभंगवाणी,रामधुन,भजन दिंडीत सहभागी श्री गुरुदेव सेवा मंडळ सेवकांना ग्रामगीता, प्रार्थना पुस्तक,टोपी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.प्रचारक चिंतन मेळाव्यात मार्गदर्शन करताना “राष्ट्रसंत साहित्य आणि ग्रामगीतेतील जीवनमूल्ये” आत्मसात करावे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे विशेष अतिथी संतोषसिंह रावत यांनी आपल्याकडुन
१०० ग्रामगीता आणि टोपी श्री गुरुदेव सेवकांना उपलब्ध करून दिल्या. भजन संध्या कार्यक्रमानंतर सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आणि प्रार्थनेविषयी ग्रामगीताचार्य विजय लाडेकर यांनी मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सेवाधिकारी शरदभाऊ सहारे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव चौथाले तर आभार प्रदर्शन सेवाधिकारी वसंतराव ताजने यांनी केले.राष्ट्रवंदना आणि स्नेह भोजनाने ग्रामजयंती महोत्सव संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामगीताचर्य गणेश मांडवकर, नामदेव पिजदुरकर, किसनराव वासाडे,सितकुरा देशमुख,गुरुदेव बोदलकर, विलासराव मांडवकर,चंद्रशेखर पिदुरकर, धनंजय गोहणे, रमेश तांगडे, माणिक पाटेवार, अरविंद केळझरकर, दिलीप येलकेवार, विलास चौधरी, सुनील एडनुतलवार, नंदू बतकमवार, गजानन कोलप्याकवार, रवि चलाख, संतोष चलाख,शशिकला मांडवकर, सुलोचना तांगडे,सविता पिजदुरकर, मंगला ताजने,उषा वासाडे,प्रभाताई चौथाले, सरीता झाडे, कल्पना पिदुरकर,दीपाली मांडवकर , सुनंदा चौधरी,चित्राताई गुरनुले, लांजेवार ताई,प्रेमिला गोहणे, शेंडेताई यांच्या सह तालुक्यातील सर्व श्रीगुरुदेव सेवा मंडळानी सहकार्य केले.