आमदार ची भेट कठीण,सामान्यांची लढाई ऋतिक आणि एकताच लढणार!

मूल
नगरपरिषद निवडणूक २०२५ जसजशी जवळ येत आहे, तसतसा शहरातील राजकीय वातावरणाचा पारा चढू लागला आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ एकता प्रशांत समर्थ मैदानात असून, प्रभाग क्रमांक ५ मधून ऋतिक गोयल हे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सध्या शहरातील मतदारांचा कल काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत असून, ‘आपल्या समस्या घेऊन नागरिकांनी नेमके कोणाकडे जावे?’ हा प्रश्न सर्वसामान्यांत ठळकपणे चर्चेत आहे. नागरिकांचा ठाम मतप्रवाह असा आहे की स्थानिक समस्या असतील तर सर्वप्रथम आपला नगरसेवक आणि नगराध्यक्षच मदतीला धावून येतात.
आमदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो, भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तर अनेकदा संपर्कही होऊ शकत नाही.मात्र आपला नगरसेवक हा २४ तास उपलब्ध असलेला ‘पहिला शेजारी’ असतो, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रभाग ५ मध्ये ऋतिक गोयल यांच्यामध्ये हीच जिद्द,धडपड आणि तत्काळ निर्णयक्षमता दिसून येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला नगरसेवक स्थानिक समस्या तातडीने सोडवू शकतो, आणि ही ताकद ऋतिक गोयल यांच्या नेतृत्वात दिसते, असेही नागरिक सांगत आहेत.
समस्या घेऊन आमदाराकडे धाव घेत राहिलो तर प्रश्न अधिकच गंभीर होत जातात,म्हणूनच नगरसेवक आणी नगराध्यक्ष हा आता शहरातील ठाम विचार बनत चालला आहे,असे स्थानिकांचे मत आहे.
त्यामुळेच प्रभाग ५ ला लोकांसोबत उभा राहणारा, तत्पर, संवेदनशील आणि संघर्षशील शेजारी नगरसेवक हवा असेल, तर ऋतिक गोयल आणि नगराध्यक्षपदी एकता समर्थ यांना निवडून देणे हीच काळाची गरज आहे, अशी चर्चा शहरभर रंगताना दिसत आहे.