युवाशक्तीचा विजय! मुलमध्ये काँग्रेसचा नवा तारा तेजोमय: ऋतिक गोयल!

मुल

नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पार्टीने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसचे उमेदवार, तरुण व ऊर्जावान नेता ऋतिक गोयल यांनी २४५ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवला. ऋतिक गोयल हे या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वात तरुण नगरसेवक म्हणून उदयास आले आहेत.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि स्थानिक ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांचे ते अत्यंत जवळचे कार्यकर्ते मानले जातात. रावत यांच्या नेतृत्वाखाली मुलमधील काँग्रेस एकजुटीने काम करत असून, त्यांनी पक्षाला नवसंजीवनी दिली आहे.

तरुण वयातच नेतृत्वगुण दाखवणारे ऋतिक गोयल यांच्याबद्दल युवक वर्गात मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि जनसंपर्कामुळे ते पुढील काळात मोठे स्थान मिळवू शकतील अशी जनतेची खात्री आहे.पक्षाकडून त्यांना जे कोणतेही जबाबदारीचे कार्य सोपवले जाईल, ते ती पूर्ण जबाबदारी व निष्ठेने पार पाडतील. तसेच,जनतेमध्ये काँग्रेस पक्षाविषयी अधिक विश्वास जागवण्याचे कार्य करतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

कुशल नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ५ ला तर विकास मिळेलच, पण संपूर्ण शहराचेही रूपांतर घडवण्याची इच्छाशक्ती ऋतिक गोयल यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसते.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षसह २० पैकी १८ जागांवर विजय मिळवून इतिहास रचला आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ आणि नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्या कुशल नेतृत्वाखाली पक्षाने निवडणुकीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली.

आगामी काळात एकता समर्थ यांच्या नेतृत्वात मुल नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील, असा जनतेला विश्वास आहे. तर प्रभाग ५ मधील विजयी नगरसेवक ऋतिक गोयल हे आपल्या कार्यक्षमतेने नगरवासीयांची मने जिंकतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.