Friday, December 19, 2025
Homeअमृत महोत्सवभारतीय संविधानातील अधिकार व नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन – प्राचार्या डॉ. अनिता...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

भारतीय संविधानातील अधिकार व नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन – प्राचार्या डॉ. अनिता वाळके

 

कर्मवीर महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम उत्साहात

मूल ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल संचालित कर्मवीर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपेंद्र वनकर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. वाळके यांनी संविधानातील अधिकारांसोबतच प्रत्येक नागरिकाने पाळावयाच्या नैतिक जबाबदाऱ्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, “संविधान ही केवळ कायदेशीर कागदपत्र नसून देशाच्या लोकशाहीची आत्मा आहे. नागरिकांनी आपले अधिकार जपतांना कर्तव्यांचीही पूर्ण जाणीव ठेवली पाहिजे.”

प्रमुख पाहुणे उपेंद्र वनकर यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक आणि मार्गदर्शन सुविधांची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बनकर व  किशोर वाळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनी मिळून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करीत देशभक्तीची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!