Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल नगर परिषद निवडणूक 2025 : निवडणुकीच्या जागा ठरत नसल्याने उमेदवार 'वेट...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगर परिषद निवडणूक 2025 : निवडणुकीच्या जागा ठरत नसल्याने उमेदवार ‘वेट अँड वॉच च्या भूमिकेत

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

     मूल नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारीला आता वेग आला असला तरी इच्छुक उमेदवार मात्र अद्यापही संभ्रमात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांचे आपल्या उमेदवारीसाठी शिफारसी आणि जोडणीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेकांनी आपल्या पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांकडे शिफारसी पोहोचवल्या सुद्धा आहेत.
मात्र या इच्छुकांपैकी अनेक उमेदवारांवर नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे मालमत्ता कर आणि इतर थकबाकी असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या नियमांनुसार उमेदवारी सादर करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी नगरपरिषदेचे सर्व थकबाकी कर भरलेले असणे आवश्यक आहे. परंतु, अद्याप प्रभागनिहाय अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे अनेक इच्छुक दुविधेत आहेत.त्यांनी एवढा मोठा कर भरावा की थांबावे, याबाबत गोंधळाचे वातावरण आहे.
काही इच्छुकांनी प्राथमिक पातळीवर संपर्क मोहिमेला सुरुवात केली असली तरी बहुतांशांनी आपल्या क्षेत्रात अजून जनसंपर्क सुरू केलेले नाहीत.
निवडणुकीचे अर्ज भरण्याचे आज चार दिवस ओलांडले असूनही अद्याप एकही अर्ज सादर झालेला नाही. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक दोघेही आश्चर्यचकित आहेत. सहसा पहिल्याच दोन दिवसांत काही अर्ज सादर होतात, परंतु यंदा उमेदवारांची संकोच वृत्ती स्पष्टपणे दिसून येत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जागांचे तिकीट वाटपचा अनिश्चिततेमुळे इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत आहेत. काही उमेदवारांना वाटते की, जर त्यांच्या प्रभागातून त्यांची तिकीट कापली तर कर भरूनही उमेदवारी व्यर्थ जाईल. त्यामुळे अनेकांनी सध्या “थांबा आणि बघा” हीच भूमिका घेतली आहे.
शहरातील नागरिक मात्र या परिस्थितीकडे कुतूहलाने पाहत आहेत. नगरपरिषद निवडणूक ही शहराच्या विकासदिशेवर थेट परिणाम करणारी असल्याने सर्वांचे लक्ष अर्ज प्रक्रियेवर केंद्रीत आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांची स्थिती स्पष्ट होताच निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!