Saturday, August 22, 2026
Homeविजयोत्सवमूल शहरात भाजपा चा विजयोत्सव जल्लोषात साजरा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल शहरात भाजपा चा विजयोत्सव जल्लोषात साजरा

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

आज लागलेल्या चार राज्य व एक केन्द्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाला मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पांडुचेरी मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट जनादेश मिळाला. सोबतच तामिळनाडू आणि केंरळ मध्ये पक्षाची मतदान टक्केवारी चांगल्या टक्क्यांनी वाढली. स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगाल या राज्यात प्रथमच भाजप ची सत्ता आली, यासाठी भारतीय जनता पक्ष मुल शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुल शहरात जल्लोष साजरा केला. या निमित्ताने कन्यका माता मंदिर ते गांधी चौक पर्यंत ढोल ताष्यात रॅली काढण्यात आली, नंतर गांधी चौकात एकत्रित येत पेढे वाटून, नारे देत, फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भाजप मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी भाजपा नेते अजय गोगुलवार, भाजप नेत्या प्रा.सौ.किरण कापगते, महामंत्री संजय येणुरकर ,महामंत्री रणजीत समर्थ,माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ प्राची आक्केवार,युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे,महामंत्री जितेंद्र टिंगुसले,प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे ,युवराज चावरे , विवेक मांदाडे,निलेश राय,सुरज मांदाडे,संदीप मोहबे,गौतम जीवने,सौ.मनिषा राखडे ,सुनिल कुकुडकर, आयेशा शेख ,सारिका वासेकर,गीता आंबूर्तीवार, सौ.सुनीता बोलीवार,ममता गोझे ,अजय वासेकर, ईश्वर लोंनबले ,प्रशांत कोहळे, आशुतोष सादमवार,संतोष गाजुलवार,आनंद आक्केवार, सोम मेश्राम, प्रवीण मोहूर्ले चिमढा, राजू शेंडे, किशोर चौखुंडे, सह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
नरेंद्र मोदी आगे बढो, सुधीरभाऊ आगे बढो अश्या नाऱ्यानी गांधी चौक परिसर दणाणून गेला होता

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!