Thursday, August 20, 2026
Homeरोजगार मेळावाशिक्षणासोबत रोजगारक्षमतेला प्राधान्य – डॉ. अनिता वाळके
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शिक्षणासोबत रोजगारक्षमतेला प्राधान्य – डॉ. अनिता वाळके

image_pdfimage_print

कर्मवीर महाविद्यालयात दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा;

मूल  ( मेहुल मनियार )

      शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि कर्मवीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ कौशल्य अधिकारी अशोक बुरेवार, जिल्हा कौशल्य विकास सहायक स्वप्नील गावंडे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक आतावूर रहमान तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. प्रविण उपरे यांनी रोजगार मेळाव्याची उद्दिष्टे स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कौशल्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अशोक बुरेवार यांनी मूल परिसरातील एमआयडीसीतील रोजगाराच्या संधी, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची प्रक्रिया आणि कौशल्य व प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. व्ही. आर. इंटरप्रायजेसचे संचालक विनायक रप्तान यांनी कंपनीतील उपलब्ध पदे, पात्रता व आवश्यक अनुभवाची माहिती दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. अनिता वाळके यांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम व आत्मनिर्भर बनविण्यावर महाविद्यालयाचा भर असल्याचे सांगितले. उपलब्ध रोजगाराच्या संधींचा विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात व्ही. आर. इंटरप्रायजेस, ग्रेटा एनर्जी लिमिटेड आणि दिनानाथ अलॉयड स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत महाविद्यालयातील उपलब्ध जागांसाठीही मुलाखती घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. लोमेश देशमुख यांनी केले, तर आभार डॉ. गणेश आगलावे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच NSS व NCC स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!