Friday, June 5, 2026
Homeमृदा परीक्षणमृदा परीक्षणामुळे उत्पादन वाढ शक्य: कृषीदूतांनी केले पारडी येथे मार्गदर्शन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मृदा परीक्षणामुळे उत्पादन वाढ शक्य: कृषीदूतांनी केले पारडी येथे मार्गदर्शन

कृषी दुताद्वारे मृदा परीक्षणा करिता लागणारे मातीचे नमुने गोळा करण्यात आले.

मुल  ( प्रा . चंद्रकांत मनियार )

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव म्हणजेच रावे (RAWE) या कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील पारडी  पारडी येथे दिनांक २ जून २०२६ रोजी शेतकरी बंधू करिता माती परीक्षण व मातीचे नमुने यांचा प्रात्यक्षिक उपक्रम घेण्यात आला . यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षणासाठी लागणारे मातीचे नमुने प्रत्येकी शेतकऱ्यांच्या शेतावरील गोळा करण्यात आले. व कृषीदुतांमार्फत शेतकऱ्यांना मातीचे नमुने कसे गोळा करावेत व ते माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेत कसे पाठवावेत याची उत्तम प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. त्याचबरोबर माती परीक्षण ही काळाची गरज आहे . आणि माती परीक्षणाचे फायदे व उपयोग जसे की पिकांच्या उत्पादनात वाढ ,पिकांची निवड ,खतांची (नत्र, स्फुरद ,पालाश) निवड ,मातीचे आरोग्य व पोत सुधारतो ,पिकांची गुणवत्ता वाढते, जमिनीतील अन्नद्रव्याची पिकांनाउपलब्धता, मातीचा पीएच (सामु) व जमिनीचा सेंद्रिय कर्ब अशा अनेक घटकांची माहिती आपल्याला मृदा परीक्षणाद्वारे मिळू शकते.व असे अनेक उपयोग व फायदे कृषिदुतानमार्फत सांगण्यात आले.

कृषी महाविद्यालय मुलचे अधिष्ठाता डॉ. व्ही.जे. अतकरे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी.गजभिये, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे व कृषी विज्ञान केंद्र, सोनापुर,गडचिरोली येथील शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉ.गणवीर सर, व मृदा विज्ञान विषयतज्ञ डॉ.विशाखा डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कृती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले व या कृती प्रात्यक्षिकाचे अध्यक्षस्थानी पारडी येथील माजी सरपंच व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय चंद्रशेखर जक्कनवार हे उपस्थित होते. त्याचबरोबर या कृती प्रात्यक्षिकासाठी इतर उपस्थित गावातील गावकरी, तरुण वर्ग ,विद्यार्थी, आणि शेतकरी वर्ग उपस्थित होऊन आपला अमूल्य सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचा मुख्य तांत्रिक गाभा व प्रात्यक्षिक कृती, छायाचित्रण,माहिती मार्गदर्शन,माहिती स्पष्टीकरण म्हणून कृषी महाविद्यालय मुल येथील विद्यार्थी गुरुदेव असोले ,श्रीराम धनजोडे ,अथर्व डोंगरे, व अनिकेत फरकडे, यांनी केले. व माती परीक्षण नमुना प्रक्रिया कशी करावी हे उत्तमपणे व शास्त्रीयपणे कृती प्रात्यक्षिकाद्वारे शेतकरी बंधूंना करून दाखवले आणि या प्रात्यक्षिका संदर्भात शेतकरी बंधूनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले .

हा उपक्रम खरोखर समाधानकारक व प्रेरणादायी ठरला व शेतकऱ्यांमध्ये मृदा संधारण व मृदा परीक्षण आणि मृदा परीक्षण ही काळाची गरज याची जागृती निर्माण झाली

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!