Friday, June 5, 2026
Homeमृदा परीक्षणमुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी प्रत्यक्ष शेतात मृदा नमुने गोळा...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी प्रत्यक्ष शेतात मृदा नमुने गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

               मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ( RAWE ) गडचिरोली तालुक्यातील इंडाळा गावातील शेतकऱ्यांना मृदा परीक्षण पद्धतीविषयी माहिती दिली. त्यांनी  आधुनिक शेतीमध्ये मृदा परीक्षणाचे काय महत्त्व आहे, हे  विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना पटवून दिले.

यावेळी जीवनदास चौधरी, संदीप जेंगठे व शिवराम जेंगठे हे शेतकरी उपस्थित होते. शेतातून मातीचा नमुना कसा घ्यावा, तो कसा वाळवावा आणि प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसमोर सादर केले.

          कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेतुन प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी. गजभिये, कृषी संशोधन केंद्र, सोनापूर येथिल वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जी.बी गणवीर आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे व मृदा विज्ञान विषयतज्ञ डॉ. विशाखा डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला

     या उपक्रमात कृषी दूत स्वयम जथाडे, चेतन कापगते, रोहित राऊत यांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!