मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
सामान्यपणे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कार्य करण्याची क्षमता असते,त्या क्षमतेला अधिक ताकद देऊन आपल्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांनी केले.. ते मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित FRAGRANCE 2026 वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते आपले विचार व्यक्त करीत होते.
डॉ. एस. आर.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मान. प्रकाश कडू, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.शेखर डोंगरे, डॉ.ए.व्ही. कोल्हे, मान.काटकर, मान.अमरशेट्टीवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी.अतकरे,डॉ. रमाकांत गजभिये, डॉ. गीतांशू डिंकवार आदी गणमान्य उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला अतिथी नी दीप प्रज्वलन आणि मालार्पण केले. डॉ. गजभिये यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यापीठांच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देतांना महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल माहिती दिली. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत प्राप्त केलेल्या प्रगती बाबत माहिती दिली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना न घाबरता पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करावा असे सांगताना त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील असल्याबाबत स्पष्ट केले. जीवनात मिळालेली जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चालविण्यात त्यांना आवड असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

डॉ. कडू यांनी कृषी महाविद्यालयाची इमारत लवकर व्हावी ही अपेक्षा व्यक्त करताना वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो असे सांगितले.
डॉ. आर. एन. काटकर यांनी कृषी महाविद्यालयाचे क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.या क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती सतत गुंतून असतो हे सांगून ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना संधी देता यावी म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे म्हटले.



