Friday, August 21, 2026
Homeमहात्मा ज्योतिबा फुले जयंतीकर्मवीर महाविद्यालय, मूल येथे महात्मा फुले जयंती निमित्त पालक मेळाव्याचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे महात्मा फुले जयंती निमित्त पालक मेळाव्याचे आयोजन

image_pdfimage_print

शिस्त, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन या त्रिसूत्रीवरच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य उभे राहते” –

प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांचे प्रतिपादन
मूल ( मेहुल मनियार )

      शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे क्रांतिज्योती महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी श्री. विनोद शेंडे (खालवसपेठ), डॉ. केवल कऱ्हाडे, डॉ. गणेश गायकवाड, प्रा. दिनेश बनकर, डॉ. प्रविण उपरे व डॉ. गणेश आगलावे आदी उपस्थित होते.
महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. प्रास्ताविकपर भाषणात डॉ. प्रविण उपरे यांनी पालक मेळावा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे अधोरेखित केले. “पालक आणि शिक्षक यांचा सुसंवादच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधारस्तंभ ठरतो,” या विचारावर त्यांनी विशेष भर दिला.
यानंतर डॉ. गणेश गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची महती सांगत आजच्या जागतिकीकरणाच्या युगात पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे अधिक सजगतेने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ. केवल कऱ्हाडे यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा सादर केला.
पालक प्रतिनिधी श्री. विनोद शेंडे यांनी महाविद्यालयाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत, स्वतः या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला. प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी पालक-शिक्षक संवादाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या नैतिक, सामाजिक व व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती, निकाल, अभ्यासातील अडचणी, स्पर्धा परीक्षा तसेच करिअर मार्गदर्शन यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. विविध विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी पालकांनीही आपल्या अपेक्षा व सूचना मांडत सकारात्मक सहभाग नोंदविला.
विशेषतः डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत होणाऱ्या बदलांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्त, नियमित अभ्यास आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवावा, असे आवाहनही करण्यात आले.
पालक-शिक्षकांमध्ये थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्यांवर चर्चा करून त्यावर योग्य उपाययोजना सुचविण्यात आल्या. या मेळाव्यामुळे पालक आणि महाविद्यालय यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश आगलावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भूषण वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!