Wednesday, October 21, 2026
Homeकृषि विद्यापीठमुल येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची तारांकित प्रश्ना द्वारे...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची तारांकित प्रश्ना द्वारे मागणी

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या महत्त्वपूर्ण तारांकित प्रश्नांना शासनाने दिलेल्या लेखी उत्तरांमधून पूर्व विदर्भातील कृषी शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुल (जि. चंद्रपूर) येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेची मागणी रास्त असल्याची शासनाने कबुली दिली असून, यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही उच्चस्तरीय समित्यांनी मुल अथवा सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविल्याचेही स्पष्ट केले आहे.

     बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मान. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पूर्व विदर्भातील हवामान, मृदाप्रकार, पीकपद्धती व संशोधनाच्या गरजा पश्चिम विदर्भापेक्षा भिन्न असल्याने स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता  अधोरेखित केली. यावर उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सन २०१३ व २०१५ मध्ये नेमलेल्या उच्चस्तरीय समित्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल अथवा सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापनेस अनुकूलता दर्शविली होती, अशी माहिती लेखी उत्तरात दिली आहे. शासनाने सध्या आर्थिक दायित्वामुळे नवीन विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला असला, तरी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय तसेच संशोधन सुविधांच्या माध्यमातून कृषी शिक्षण सुरू असल्याचेही लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. मात्र, समित्यांच्या सकारात्मक अहवालानंतरही स्वतंत्र कृषी विद्यापीठाचा निर्णय अद्याप न झाल्याचे उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!