Sunday, April 19, 2026
Homeराष्ट्रीय सेवा योजनाकर्मवीर महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित बोर चांदली येथील रा.से.यो. विशेष वार्षिक शिबिराचे...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित बोर चांदली येथील रा.से.यो. विशेष वार्षिक शिबिराचे उदघाटन संपन्न

मूल : ( मेहुल मनियार )

      कर्मवीर महाविद्यालय, मूल च्या राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागामार्फत आयोजित विशेष वार्षिक शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोरचांदली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हे शिबिर “Youth for My Bharat” आणि “Youth for Digital Literacy” या संकल्पनांवर आधारित असून, दिनांक २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, मूलचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. गुरुदास बल्की, चंद्रपूर जिल्हा रा.से.यो. समन्वयक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड. अनिल वैरागडे यांनी रा.से.यो. हे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे नमूद केले. ग्रामीण विकास, स्वच्छता व डिजिटल साक्षरतेसारख्या उपक्रमांमधून युवकांनी समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी प्रतिपादन केले.
उद्घाटक प्रा. गुरुदास बल्की यांनी आपल्या भाषणात रा.से.यो. स्वयंसेवक हे राष्ट्रउभारणीचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. “Youth for My Bharat” ही संकल्पना आत्मसात करून सेवा, शिस्त व समर्पणाच्या भावनेतून युवकांनी गावकेंद्रित विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान. शि. प्र. म. चे सचिव शशिकांतजी धर्माधिकारी, सौ. ललिता सेमस्कार (सरपंच, ग्रामपंचायत बोरचांदली), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके. हरीभाऊ येनगंटीवर (उपसरपंच, ग्रामपंचायत बोरचांदली),. मारोती जिल्हेवार (मुख्याध्यापक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बोरचांदली), श्री. पुल्लावार (सदस्य, शि.प्र.मं., मूल), डाॅ.रमेश पारेलवार, श्रीमंती लता पारेलवार (समुपदेशक युवा समस्या),. श्री. संजय पा. कुंटावार,. श्री. राजीव पा. येनुगवार,. श्री. महेशभाऊ कटकमवार (सदस्य, ग्रामपंचायत बोरचांदली), श्री. दशरथ मडावी (पोलीस पाटील) तसेच प्रा. दिनेश बनकर ,प्रा.अनिल शेलेकर,प्रा.राहुल बोधे,प्रा.भुषण वैद्य,प्रा .देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद व रा.से.यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात या विशेष शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, श्रमदान , महिला सक्षमीकरण, साक्षरता, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध व्याख्याने, सामाजिक प्रबोधन उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.शिवाय NOT ME BUT YOU या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्यांचा सखोल आशय कथन करीत सामाजिक बांधिलकी कशी जपणारा आहे.यावरही प्रकाश टाकला.प्रा.रमेश पारेलवार यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मनाला कसे स्थिर व शांत ठेवायचे याबाबत माहिती दिली.मान.लता पारेलवार यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा मंत्र विद्यार्थ्यांना सांगितले.
सदर शिबिराचे आयोजन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण उपरे व सह कार्यक्रम अधिकारी डॉ. केवल कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समीर अलूरवार यांनी केले, तर प्रा. प्रविण उपरे यांनी आभार मानले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!