Sunday, April 19, 2026
Homeव्यावसायिक गॅस सिलेंडरव्यावसायिक गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा करण्याबाबत मागणी

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा करण्याबाबत मागणी

  • मूल ( मेहुल मनियार )

      सध्याच्या परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होण्यामध्ये काही प्रमाणात अडचणी येत आहे. घरपोच सेवा पुरवून अडचणी दूर करण्याचा गॅस एजन्सी द्वारे प्रयत्न होत आहे.अशा स्थितीत व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने लहान मोठ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. छोटे व्यावसायिक आपल्या घरी चुलीवर विक्रीसाठी आवश्यक असलेले पदार्थ बनवून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. एकंदरीत लहान व्यावसायिकांना आपले कुटुंब चालविण्यासाठी व्यवसाय चालवीने फारच कठीण होत असल्याचे चित्र दिसत आहे. या कारणामुळे काही हॉटेल मालकांनी खाद्यपदार्थाचे भाव सुद्धा वाढविले आहे.
गॅस कंपनी द्वारे घरगुती गॅस सिलेंडर सोबतच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा केल्यास ही समस्या दूर होऊ शकेल. अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल टहलीयानी यांनी केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा झाल्यास लहान व्यावसायिक सोबत मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा सोयीस्कर होऊ शकेल. सरकारने याबाबतीत लक्ष देऊन गॅस एजन्सीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!