Wednesday, October 21, 2026
Homeमहात्मा गांधी जयंतीमूल येथील खादी ग्रामोद्योग केंद्रात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील खादी ग्रामोद्योग केंद्रात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

image_pdfimage_print

गांधी सप्ताहानिमित्त खादी सेलचे उद्घाटन;

मुल ( मेहुल मनियार )

     मूल येथील नाग विदर्भ चरखा संघ,द्वारा संचालित खादी ग्रामोद्योग केंद्र, मुल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गांधी सप्ताहाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही खादी सेलचे उद्घाटन करण्यात आले.
खादी सेलचे उद्घाटन डॉ. अशोक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगर परिषद सभापती मिलिंद खोब्रागडे व सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा गांधी जयंतीपासून पुढील ४५ दिवस खादी कापडाच्या खरेदीवर २० टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेत खादी वस्त्रांची खरेदी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव दादाजी बनकर, सहसचिव राजू गुरनुले तसेच खादी ग्रामोद्योग केंद्राचे व्यवस्थापक गुरुदास बोरकर यांची विशेष उपस्थिती होती.
महात्मा गांधी यांनी स्वदेशी, स्वावलंबन आणि ग्रामोद्योगाला देशाच्या विकासाचे महत्त्वाचे साधन मानले होते. त्याच विचारांना पुढे नेत स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला बळकटी देणे, ही काळाची गरज असल्याचे आवाहन यावेळी केंद्राच्या वतीने करण्यात आले.
गांधी जयंती आणि गांधी सप्ताहाच्या निमित्ताने खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये विविध प्रकारचे खादी कापड व वस्तू उपलब्ध असून, नागरिकांनी खादीचा स्वीकार करून ‘स्वदेशी ते स्वावलंबन’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!