Friday, August 21, 2026
Homeजलतरण तलावन.प .चे बंद जलतरण तलाव सुरू करा--- जलतरण संघटनेची मागणी
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

न.प .चे बंद जलतरण तलाव सुरू करा— जलतरण संघटनेची मागणी

image_pdfimage_print

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांमध्येही दुर्लक्षित आहे जलतरण तलाव

मूल ( मेहुल मनियार )

मूल येथील जलतरण संघटनेच्या वतीने या क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करीत जलतरण तलावा साठी साकडे घातले, सुधीरभाऊनी निधी मंजूर करून दिला, लोकार्पण झाले, शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी हे व्यायामासाठी त्याचा वापर करायला लागले,  विशेष करून सिंदेवाही, सावली, पोंभुरणा, गोंडपीपरी अश्या आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा विद्यार्थी स्पर्धेच्या प्रॅक्टिस करण्यासाठी सदर जलतरण तलावात येत असत.      मात्र मागील काही दिवसांपासून सदर वास्तू शोभेची वस्तू बनली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात सकाळी शाळा झाली आणि सुट्ट्या लागल्या की सदर जलतरण तलावात विद्यार्थ्यांची रेलचेल राहत होती, पण या वर्षी जलतरण तलावाचे कुलूप सुद्धा उघडल्या गेले नसून अनेक विद्यार्थी, महिला, पुरुष यांच्याकडून विचारणा होत असतांनाही नगर परिषद पदाधिकारी व प्रशासन मात्र लक्ष  देत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता सामाजिक क्षेत्रात काम करणारी जलतरण संघटनेने मुख्याधिकारी संदीप रोडे यांना निवेदन दिले असून तलाव सुरू न केल्यास प्रसंगी नगर परिषद ला जागविण्यासाठी आंदोलनं करावे लागेल असा इशाराही दिला आहे. निवेदन देतांना किशोर कापगते, संजय चिंतावार, प्रवीण मोहूर्ले,प्रमोद कोकुलवार, निलेश रायकंठीवार, राजेश व्यास, गौतम जीवने, रज्जू कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!