Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदानाची काँग्रेस ने केली तक्रार
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदानाची काँग्रेस ने केली तक्रार

image_pdfimage_print

बूथ क्रमांक 10/3 वर झालेल्या बोगस मतदानाची तक्रार

मूल
नगरपरिषद निवडणूक २०२५ शांततेच्या वातावरणात, किरकोळ  घटना वगळता सुरळीतपणे पार पडली. मात्र शहरातील बूथ क्रमांक 10/3, सुभाष प्राथमिक शाळा येथे मतदानासंबंधी गंभीर तक्रार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या बूथवर दोन मतदारांनी आपण मतदानच केले नसताना आमच्या नावावर मतदान झाले असल्याची तक्रार नोंदवली आहे.त्यामध्ये
शब्बीर शेख आणि प्रेमिला गोहणे या दोन्ही मतदातांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी मतदान केलेले नाही. त्यांच्या हातावर मतदानाची शाई लावलेली नाही. तसेच, यामध्ये संबंधित महिला मतदार अंगठ्याचा ठसा देणारी असल्याचेही सांगण्यात आले.
तक्रार दाखल होताच संबंधित बूथ अधिकाऱ्यांनी नोंदी तपासून मतदान झाले असल्याची माहिती दिली. त्यांच्यानुसार मतदान झालेल्या व्यक्तींचा तपशील असा-  1.मतदार यादी क्रमांक 28, बूथ मतदान क्रमांक 271 — शब्बीर शेख (ओळख: आधार कार्ड)

2.मतदार यादी क्रमांक 215, बूथ मतदान क्रमांक 85 — प्रेमिला गोहणे
(ओळख: एपिक क्रमांक 3925)

या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेस च्या तक्रारीच्या आधारे प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपशीलवार तपास केला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार मोरे यांनी सांगितले असून  पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  दोन्ही मतदारांना बॅलेट पेपर द्वारे मतदान करू दिले, असल्याचे सांगितले गेले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!